महापालिका आयुक्तांकडून ठाण्यातील प्रकल्पांची पाहणी – प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिका आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पाहणी करून सर्वच प्रकल्पांच्या कामांची गती वाढवण्याचे आदेश दिले. महापालिका आयुक्तांनी विटावा येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सपासून पाहणीस सुरूवात केली. या पाहणी दौ-यात लोकप्रतिनिधी तसंच वरिष्ठ अधिकारी वर्गही सहभागी झाला होता. विटावा स्पोर्टस् कॉम्प्लेक्सची पाहणी करताना आयुक्तांनी पर्यावरण पूरक ग्रीन वॉल बनवण्याच्या सूचना देताना क्रीडा साहित्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यास सांगितली. कळवा ब्रीजची पाहणी करताना जूनपर्यंत कळवा पूलाचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना केली. खारेगाव फाटक येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून हा पूल मे पर्यंत पूर्ण होईल यादृष्टीनं जलद गतीनं काम करण्याचे आदेश दिले. पारसिक चौपाटी, साकेत, बाळकूम वॉटर फ्रंटची पाहणी करताना कामाची गती वाढवण्याची सूचना केली. ज्युपिटर लेव्हल पार्किंग प्रकल्पाला भेट देऊन पार्कींगचे पहिले चार मजले लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या शाळा क्रमांक ४४ येथे बांधण्यात आलेल्या विज्ञान सेंटरला त्यांनी भेट देऊन विज्ञान सेंटरबाबत समाधान व्यक्त केलं. ३२ एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या अद्यावत सेंटर पार्कमध्ये तलाव, चिल्ड्रन्स प्ले एरिया, कारंजे आणि स्पोर्टस् असे चार भाग असून चिल्ड्रन प्ले एरिया वगळता इतर सर्व कामं गतीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले. हिरानंदानी, पातलीपाडा येथील अर्बन जंगलाची पाहणी करताना झाडांची वाढ चांगल्या रितीनं होत असल्यामुळे उद्यान विभागाच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. अकिरा मियावाकींच्या संकल्पनेनुसार स्थानिक वृक्ष, झुडुपांची लागवड करणे, वॉकींग ट्रॅक आणि पार्कींगची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading