zp

जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समितीच्या सभापतींना यशदामध्ये प्रशिक्षण

ठाणे जिल्हा परिषदेतील सदस्यांना जिल्हा परिषद कामकाज विषयक धडे पुण्याच्या यशदा मध्ये दिले जाणार आहेत. येत्या गुरूवारपासून तीन दिवसाच्या निवासी शिबीरात तज्ञ अधिका-यांकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित ५३ सदस्य आणि ५ पंचायत समितीच्या सभापतींना हे नियमांचे धडे दिले जाणार आहेत. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर जवळपास सव्वा तीन वर्ष प्रशासकीय राजवट होती. डिसेंबर २०१७ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आली. नवीन निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ३ ते ४ सदस्यांचा अपवाद वगळता सर्वच सदस्य प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या कारभारा बरोबरच नियमांची माहिती मिळण्यासाठी असं प्रशिक्षण आवश्यक होतं. त्यानुसार यशदा तर्फे १५ ते १७ मार्च दरम्यान हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांबरोबरच भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण पंचायत समितीच्या सभापतींनाही ही प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात सरकारी नियम, कामकाज आणि प्रशासकीय पध्दतीची सदस्यांना ओळख करून दिली जाईल असं उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितलं.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *