राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता असताना मध्य रेल्वे मात्र मराठीला फारशी किंमत देत नसल्याचं उघड

राज्यामध्ये मराठीसाठी लढणा-या शिवसेनेची सत्ता असताना मध्य रेल्वे मात्र मराठीला फारशी किंमत देत नसल्याचं दिसत असून यावर लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प असल्याचं दिसत आहे. पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेसचं रूपडं नुकतंच पालटलं आहे. परंतु हे रूपडं पालटवताना केंद्र शासनाच्या अखत्यारीतील शासकीय यंत्रणेचा मराठीबद्दल असलेला आकस दिसत आहे. या गाडीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढण्यासंदर्भात असलेल्या सूचना फक्त इंग्रजी आणि हिंदीतून देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रीनुसार मराठीची जागा कोरी असल्याचं दिसत आहे. डेक्कन एक्सप्रेस ही गाडी मुंबई-पुणे धावते पण राज्याच्या भाषेत सूचना लिहिली जात नाही याबद्दल कोणालाच त्याचं सोयरसुतक असल्याचं दिसत नाही. ही गोष्ट क्षुल्लकही वाटेल पण राज्यभाषेला स्थान न मिळणं हे संतापजनक आहे आणि मध्य रेल्वेकडून अनेकदा मराठीला डावललंच जात असल्याचं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading