राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

सिंधुदुर्गतील देवबाग बीच येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे. पृथ्वीराज कांबळे या जलतरण पटूनं १० किलोमीटरचं अंतर पार करत या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. एक किलोमीटर स्पर्धेत सोहम साळुंखेनं तृतीय क्रमांक तर ५०० मीटर स्पर्धेत आयुषी खाडे हिनं तृतीय क्रमांक पटकावला. आदित्य घाग याने तृतीय क्रमांक पटकावला. ईशा शिंदे हिनं १० किलोमीटरचं अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं. या सर्व जलतरण पटूंचं महापौरांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: