बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी आणलेल्या दोघांना वन विभागानं केलं जेरबंद

बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी आणलेल्या दोघांना वन विभागानं जेरबंद केलं आहे. उपवन तलावाजवळ काही व्यक्ती बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन विभागास मिळाली होती. त्यानुसार वन विभागानं दोन पथकं तैनात केली होती. माहितीनुसार काल दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन काळ्या रंगाच्या बॅग घेऊन दोन व्यक्ती आल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये बिबट्याचं कातडं आढळलं. याप्रकरणी नरेंद्र गुरव आणि अजित मराठे अशा दोघांना पकडण्यात आलं असून या दोघांनी बिबट्याचं हे कातडं सिंधुदुर्ग येथून आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक वन संरक्षक अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading