धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. काल शहराबरोबरच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७४ मिलीमीटर तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११६ मिलीमीटर पाऊस झाला. यामुळं भातसा धरणाच्या पाणी साठ्यात ३ टक्क्यानं तर बारवी धरणाच्या पाणी साठ्यात ४ टक्क्यानं वाढ झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading