ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना केली अटक

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेपाच लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक क्रमांक १ च्या पोलीसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शहेजाद अन्सारी, महम्मद शेख, सद्दाम शेख आणि महम्मद शेख अशा चौघांना अटक केली. या चौघांच्या चौकशीत त्यांनी चोरी केलेले ३ लाख ८५ हजारांचे ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन हस्तगत केले. त्यांच्याकडून वर्तकनगर, मुंब्रा पोलीस, कासारवडवली, कोपरी या ठिकाणचे गुन्हे उघडकीस आणून १ लाख ४५ हजार किंमतीचे २९ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंब्रा पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या समांतर तपासात विनोद गौतम, मुसेफ कुरेशी अशा दोघांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. त्याचप्रमाणे ठाणे नगर पोलीस ठाण्यातील समांतर गुन्ह्याच्या तपासात सूरज यादव, बाबा रॉड्रीक्स अशा दोघांना अटक करून २ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading