तृतीयपंथीयांच्या मानवाधिकाराविषयी जनजागृती करण्याकरिता ९ ऑक्टोबरला मॅरेथॉनचं आयोजन.

‘तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश जनमानसांत बिंबविण्याच्या उद्देशाने ठाण्यात एम स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथे ‘एक मैल’ अंतर्गत दौडचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १८, १९ ते २९, ३० ते ४४, ४५ ते ६० या वयोगटातील मुले, मुली, पुरुष, महिला आणि जेष्ठांसाठी एक मैल दौड होणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  या दौड अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी ही विशेष मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातून १५० तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading