जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षित बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज दिले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक आज शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी म्हणाले की, विभागामार्फत विविध योजनांतर्गत तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. मात्र त्यानंतर त्या युवकांना स्वयंरोजगार अथवा रोजगार मिळतो का याची माहिती घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यात किती युवक बेरोजगार आहे, या माहितीचा डाटा तयार करण्यात यावा. दरवर्षी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून अनेक तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात अशा तरुणांची माहिती या डाटामध्ये समाविष्ट करावी. जेणेकरून जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देता येईल. अनेक क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांची आवश्यकता असते. अशी क्षेत्रे हेरून त्याप्रमाणे तरुणांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात नियोजन करावे. यावेळी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण, प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण, आरोग्य क्षेत्रातील विशेष प्रकल्प, संकल्प योजना, प्रमोद महाजन कौशल्य- उद्योजकता विकास अभियान आणि किमान कौशल्य विकास कार्यक्रम आदी योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading