कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेमुळे खळबळ

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये एका बेवारस बॅगेनं काही काळ खळबळ उडवून दिली. कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बसमध्ये २ बेवारस बॅगा आढळल्या. एमआयडीसी मधून डोंबिवलीकडे जाणारी बस शेवटच्या थांब्यावर आली असताना बसच्या शेवटच्या सीटवर दोन बॅगा असल्याचं प्रवाशांनी लक्षात आणून दिलं. या बॅगा बसमधील कोणत्याही प्रवाशाच्या नसल्यानं कंडक्टरनं ही बस पोलीस येईपर्यंत थांबवून ठेवली. या बॅगा काढून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्या. यामध्ये साधारण एक तास गेला. ही बॅग बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पोलीसांनी ही बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये कागदपत्रं, बँक पासबुक असे सामान होते. या कागदपत्रांवरून ही बॅग गिरिश शहा यांची असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मात्र सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading