9 व्या राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग जलतरण स्पर्धेत प्रथमच मारोतराव शिंदे तरण तलाव येथील 18 प्रशिक्षणार्थी सहभागी

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित 9 व्या राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग जलतरण स्पर्धेत प्रथमच ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे पोहण्याच्या सरावासाठी येत असलेले 18 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. विविध गटात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी 5,  2, आणि 1 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करीत पदके प्राप्त केली. ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे विविध गटातील नागरिक तसेच मुले सरावासाठी येत असतात. या ठिकाणी नियमित सरावासाठी येणाऱ्या मुलांना स्पर्धेत उतरवून त्यांचा उत्साह वाढवावा किंबहुना त्यांना विविध स्पर्धांसाठी प्रेरित करावे या हेतूने प्रशिक्षणार्थींना मालवण चिवला बीच येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध गटातून एकूण 18 स्पर्धक सहभागी झाले होते. 5 किलोमीटर स्पर्धेत अद्वैत गावडे, प्रशांत बटूळे, दिशांत बटूळे, वरद राजगोंड, सौरभ पंदिरकर, 3 किलोमीटर स्पर्धेत स्वयंम देसाई, पवन कदम, अयुष राणे, सोहम पाटील, भरत मोरे, 2 किलोमीटर स्पर्धेत100 टक्के अंध असलेला राजेश मेहता आणि 1 किलोमीटर स्पर्धेत अरूष अडसुळे, अथर्व पवार, ध्रुव कोळी, अपूर्व पवार, सायुज्य नाईक, लष्कर मोरे तर विशेषमुलांमध्ये अन्वय मेत्री, करण नाईक हे सहभागी झाले होते. या सर्व जलतरणपटूंनी आपले अंतर यशस्वीरित्या पार करीत पदके पटकाविली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading