स्टारफिश स्पोर्टस फौंडेशनच्या जलतरण पटूंची पदकांची लयलुट

विजय दुर्ग येथे झालेल्या श्री.दुर्गामाता, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या वतीने तिस-या सी/चॅनेल स्विमिंग कॉम्पिटीशन-2021 या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फौंडेशनच्या जलतरण पट्टूनी विविध गटात उल्लेखनीय कामगिरी करुन, सुवर्ण, रौप्य, कांस्य या पदकांची लयलुट करुन ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विजय दुर्ग येथे झालेल्या स्पर्धेमध्ये जलतरण पट्टू मानव मोरे यांस 30 कि.मी. स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल, आयुष तावडे यांस 30 कि.मी. स्पर्धेत सिल्व्हर मेडल, मानव मोरे यांस 3 कि.मी व्यक्तीगत स्पर्धेमध्ये 7 क्रमांक पटकावला तर वेद दुसा यांने या स्पर्धेत 11 वा क्रमांक पटकविलेला आहे. त्याचप्रमाणे 2 कि.मी. व्यक्तीगत स्पर्धेत सोहम साळूंके दुसरा, विजय ओजाळे-सहावा आणि विकास निसार-सातवा आणि 1 कि.मी. व्यक्तीगत स्पर्धेत आदित्य वाघ-पहिला, परिन पाटील-दुसरा, आर्यन परब-चौथा, आयुष तावडे सहावा आणि रेवती वाघ याने सहावा क्रमांक पटकाविला. 500 मी स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये आयुषी आखाडे-पहिला, निधी सामंत-तिसरी, फ्रेया शाह-चौथी आणि शृती जांभळे-दहावी आणि माही जांभळे हिने अकरावा क्रमांक पटकाविला आहे. तसेच 500 मी स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये विराट ठक्कर दुसरा, रुद्र निसार-तिसरा, युवराज राव-पाचवा आणि वरद कोळी-नववा, तृणांश गंद्रे- अकरावा, नक्ष निसार- चौदावा, ओजस मोरे यांने सतरावा क्रमांक पटाकावून पदकांची लयलुट केलेली आहे. या स्पर्धेमध्ये ठाणतील स्टार फिश स्पोर्ट् फांऊंडेशनच्या जलतरण पट्टूंनी उल्लेखनीय कामगिरी केली केली आहे. महापौरांनी जलतरण पट्टूचे अभिनंदन करुन, त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक कैलास आखाडे, रुपेश घाग, विजय ओजाळे यांचेही अभिनंदन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading