​यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद

यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला ठाणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळीपूर्व आणि दिवाळीनंतर कालावधीमध्ये हवा आणि ध्वनी प्रदुषणामध्ये वाढ झालेली आढळली नाही. नागरिकांनी दिवाळी सणाचे पावित्र्य राखत कोरोना नियमांचे पालन करुन सामाजिक भान ठेवून ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीने दीपावलीपूर्व आणि दीपावली कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी दीपावलीपूर्व कालावधीत २४ तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण 228 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते. नायट्रोजन ऑक्साईड वायुचे प्रमाण 26 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ऑक्साईड या वायूचे प्रमाण 15 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले होते. त्याचप्रमाणे ध्वनीची अधिकतम तिव्रता ६8 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती. तसेच ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी २४ तासांकरिता हवेतील तरंगते धुलिकणांचे प्रमाण 233 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते आणि नायट्रोजन ऑक्साईड या वायूचे प्रमाण ३0 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ऑक्साईड प्रमाण २0 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले आहे तर ध्वनीची अधिकतम तीव्रता ७२ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली आहे. दीपावली कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत वाढ दिसून येत नसून लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजता या कालावधीत ध्वनी तीव्रता अधिकतम म्हणजेच 72 डेसिबल इतकी आढळली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading