जिल्ह्यात कोरोनाचे ११५ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ११५ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ३९१ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५४७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३८ नवे रूग्ण मिळाले तर १ मृत्यू, सध्या ४२० रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ३१९ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८२४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १९ नवे रूग्ण १ मृत्यू तर ३०८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९६० जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ५ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ८६ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ४२ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ४ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या २२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ११ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४१ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ३७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ७ नवे रूग्ण एकही मृत्यू नाही तर ११६ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading