​महापालिकेमध्ये ५ दिवसांच्या आठवड्याबाबतच्या कामकाजाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांची मागणी

पाच दिवसांचा आठवडा लागू केलेल्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. २८ फेब्रुवारी २०२० ला ठाणे महापालिकेत ५ दिवसांचा आठवडा करण्यात आला. ५ दिवसांचा आठवडा केल्यानंतर महापालिकेतील कामांच्या वेळा बदलण्यात आल्या. ५ दिवसांच्या आठवड्यासाठी सोमवार ते शुक्रवार पावणे दहा ते सव्वा सहा अशी कामकाजाची वेळ निर्धारीत करण्यात आली होती. पण महापालिकेच्या कोणत्याही विभागात या वेळेचं पालन होत नाही. याचा फटका ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला अनेकदा बसतो. महापालिकेत कर्मचारी वेळेवर येत नाहीत यासाठी २८ फेब्रुवारीच्या परिपत्रकाला व्यापक प्रसिध्दी द्यावी आणि महापालिकेचं कामकाज यावेळेत होईल याकडे लक्ष द्यावं अशी मागणी संजीव दत्ता यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading