ठाण्यातील नानजी खिमजी ठक्कर महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आज सकाळी आग लागली होती. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. नानजी खिमजी महाविद्यालयातील शिक्षकांच्या खोलीत ही आग लागली होती. आगीचं वृत्त हाती येताच अग्निशमन दल तसंच आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही.