जिल्ह्यात कोरोनाचे १३९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १३९ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ५२२ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज २४ नवे रूग्ण मिळाले तर १ मृत्यू, सध्या ४२३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५४ नवे रूग्ण, १ मृत्यू तर २९३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८२४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २७ नवे रूग्ण ० मृत्यू तर ३७७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९५९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ११ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ८८ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ४७ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १७ नवे रूग्ण एकही मृत्यू नाही तर १६४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading