६ कोटींच्या अपहार प्रकरणात ३ अधिका-यांसह ७ पोलीस कर्मचारी निलंबित

६ कोटींच्या अपहार प्रकरणात ३ अधिका-यांसह ७ पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुंब्रा पोलीसांनी एका प्रकरणात ३० कोटींची रक्कम जप्त केली होती. रक्कम जप्त केल्यानंतर यातील ६ कोटींची मागणी करण्यात आली. २ कोटी रूपये देण्याची संबंधित व्यावसायिकाची तयारी होती. मात्र पोलीसांनी प्रकरण न वाढवण्यासाठी ६ कोटी रूपये घेतले. या बभ्रा झाल्यावर हे प्रकरण पोलीसांच्या अंगाशी आलं आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे अधिकारी अडकल्यामुळे या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरिक्षक गिताराम शेवाळे, पोलीस उपनिरिक्षक रवि मदने, हर्षल काळे, पोलीस नाईक पंकज गायकर, जगदिश गावित, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य तर पोलीस शिपाई ललित महाजन आणि निलेश साळुंखे अशा एकूण १० जणांना प्राथमिक चौकशीअंती निलंबित करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading