छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वार्डमधील डॉक्टरांची आणि नर्सेस ची कमतरता अनेक दिवसांपासून आहे. एक नर्स 50 रुग्णांची तपासणी करते, त्यात रुग्णालयातील इतर समस्या निकाली लागत नाहीत वेतनात वाढ होत नाही, स्टाफ कमी असल्यामुळे उपस्थित स्टाफ वर कामाचा बोझा वाढतो, तसेच नर्सेसना पगार कमी असल्यामुळे इथे नोकरीसाठी येत नाही,यासाठी रुग्णालयातील नर्स, स्टाफ आणि कामगारांनी युनियन कडे धाव घेतली. मात्र चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक भीमराव जाधव आणि डॉ अनिरुद्ध माळगावकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. यावेळी सर्व बैठक झाल्यानंतर मुख्य अधीक्षक भीमराव जाधव यांनी सकारात्मक भूमिका मांडत या प्रश्नांवर येत्या महिन्याभरात तोडगा काढणार असल्याचे आश्वासन कामगारांना आणि युनियन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading