५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्टना ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक

बालेवाडी येथे झालेल्या ५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या तीन खेळाडूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावलं आहे. पुण्यातील बालेवाडी येथे ५५वी राष्ट्रीय जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान झाली. या स्पर्धेत पूर्वा किरवे हिनं सर्वसाधारण गटात सुवर्ण, बॅलन्सिंग बिम मध्ये सुवर्ण, सांघिक गटात सुवर्ण, टेबल व्हॉल मध्ये रौप्य तर फ्लोअर प्रकारात कांस्य पदक पटकावलं. सोहम नाईकनं सर्वसाधारण गटात रौप्य, फ्लोअर अनईव्हन बार आणि सांघिक प्रकारात सुवर्ण पटकावलं. श्रेयस मंडलिकनं सांघिक गटात रौप्य पदक पटकावलं. सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading