२७ लाख रूपयांचा जेसीबी चोरणा-या दोघांना २४ तासात अटक

२७ लाख रूपयांचा जेसीबी चोरणा-या दोघांना २४ तासात अटक करण्याची कामगिरी कासारवडवली पोलीसांनी केली आहे. २४ जानेवारीला अभिमन्यू मढवी यांचा जेसीबी ते राहत असलेल्या वाघबीळ रोडवरील मोकळ्या जागेत पार्क करून गेले होते. दुस-या दिवशी ते पुन्हा जेसीबी घ्यायला आले असता त्यांचा जेसीबी गायब झाला होता. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीनंतर कासारवडवली पोलीसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीची तपासणी केली तसंच तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींचा कयास बांधला. जेसीबीची चोरी करणारे आरोपी हे पुण्यातील दौंड येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड येथे जाऊन सुमित चितारे आणि चंद्रकांत पोटे अशा दोघांना अटक करून त्यांच्याकडील जेसीबीही हस्तगत केला. कासारवडवली पोलीसांनी अवघ्या २४ तासात २७ लाखांचा चोरीला गेलेला जेसीबी शोधून दोन आरोपींनाही अटक केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading