१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये १० टक्के सूट

जे करदाते १५ जून पर्यंत २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये १० टक्के सूट देण्याचा निर्णय पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी घेतला असून सर्व करदात्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके जनरेट करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याकरिता महापालिकेच्या संकेस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई -सुविधेमार्फत करदाते ऑनलाईन पद्धतीने जमा करून प्रिंट घेवू शकतात. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग आणि शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष बिले वितरित होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेता करदात्यांनी महापालिकेच्या ई-सुविधेद्वारे मालमत्ता कर भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. १५ जून २०२१ पर्यत २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये १० टक्के सूट देण्यात येणार आहे तर १६ जून ते ३० जूनपर्यंत ४ टक्के १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत ३ टक्के आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत २ टक्के सूट देण्यात येणार आहे. महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच डीजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारेही मालमत्ता कर जमा करण्याची अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading