गरोदर महिलेला बेड रिकामा करण्यास भाग पाडणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालय प्रशासनाला धर्मराज्य पक्षाचा दणका

प्रसूतीपूर्व नोंदणी करूनही, बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेलेल्या महिलेला, हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुडवडा असल्याचे कारण सांगत दुसऱ्याच दिवशी पीडित गरोदर महिलेस बेड रिकामा करण्यास भाग पाडण्याचा असंवेदनशील आणि संतापजनक प्रकार ठाणे महापालिकेच्या पडवळनगर येथील मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहात घडला. रिक्षाचालक असणारे आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ अंतर्गत रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे सदस्य पंकज तिवारी यांच्याबाबत हा दुर्दैवी प्रकार घडला. यासंदर्भात तक्रार दाखल होताच यासंदर्भात धर्मराज्य पक्षाचे युवा संघटक अजय जया आणि रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष रमेश रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल होताच त्यांनी समाजसेवक गजानन पाठारे यांना हा प्रकार सांगितला. दरम्यान अजय जया यांनी रिक्षा-टॅक्सी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाच्या प्रशासनाकडे संपर्क साधून, पीडित गरोदर महिलेबाबत घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. अखेर रुग्णालय प्रशासनाने नमते घेत, पीडित गरोदर महिलेस आज पुन्हा दाखल करुन घेतले. या असंवेदनशील आणि संतापजनक घटनेचा धर्मराज्य पक्षाने निषेध नोंदविला आहे. अशापद्धतीने कोणत्याही रुग्णाची पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अडवणूक होत असेल, तर धर्मराज्य पक्षाच्या अजय जया यांच्याशी ९६१९१११६४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading