१२७२ रुपये लिटरच्या हँडवॉश मध्ये कोणाचे हात धुतले जाणार – ठाणे मतदाता जागरण अभियान

१२७२ रुपये लिटरच्या हँडवॉश मध्ये कोणाचे हात धुतले जाणार ?आपला दवाखाना हे
आरोग्याचे नाही तर जाहिरातीचे प्रतीक ठाणे महापालिकेच्या शाळेत पुढील वर्षभरात
११००० लिटर हँडवॉश साबणाने विद्यार्थी हात धुतील.असे मानून त्याची खरेदी करण्यात
येत आहे. पण या शाळेत पाण्याची सोयच नसेल आणि प्रसाधन व्यवस्था चांगली नसेल
तर हे हँडवॉश काही दिवसातच शिक्षक, अधिकारी, नगररसेवक यांच्या घरात वा
कार्यालयात वापरले जाणार, म्हणजे नाव विद्यार्थ्यांच्या हात स्वच्छतेचे, प्रत्यक्षात
नागरिकांचा खिसा १ कोटी ४० लाखाने स्वच्छ केला जाणार. यात मोठा गैरव्यवहार हि
खरेदी करता कामा नये असा आरोप ठाणे मतदाता जारनं अभियानाचा आहे. या पेक्षा हेच
पैसे वापरून सर्व शाळेतील प्रसाधन व्यवस्था चांगली करावी अशी अभियानची मागणी
आहे. तसेच आपला दवाखाना या नावावर पालिका वर्षाला ३० कोटी खर्च करणार आहे.
वास्तविक यातून जाहिरातीचे फोटो, फलक असलेल्या टपऱ्या विविध विभागात उभ्या
राहतील त्यापेक्षा हेच पैसे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर वा आहेत त्या प्राथमिक
आरोग्य केंद्रावर खर्च करावेत आणि आधुनिक सेवा नागरिकांना मोफत देण्यात याव्यात,
अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियान केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading