स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 14 ऑगस्ट रोजी 10 कि.मीच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आज झालेल्या बैठकीत स्पर्धेचे नियोजन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या. तसेच ठाणे महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेच्यावेळी ठाणे पोलीसांची मॅरेथॉन सुद्धा ठाणे महापालिका भवन येथून सुरू होवून याच ठिकाणी समाप्त होणार आहे.
जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष खुला गट आणि महिला खुला गट असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 15 हजार रूपये, द्वितीय क्रमांकास 12 हजार, तृतीय क्रमांकास 10 हजार, चतुर्थ 7 हजार तर पाचव्या क्रमांकाला 5 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading