जिल्ह्यात कोरोनाचे १६९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १६९ नवे रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ४८ रूग्ण आढळले. सध्या ३१२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १४७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १४ रूग्ण आढळले. सध्या ७३ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५९ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ७० नवे रूग्ण आढळले. सध्या ३८२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५२ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज २७ रूग्ण आढळले. सध्या १४४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३ रूग्ण तर सध्या ३४ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६६२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ रूग्ण, सध्या १६ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर ११ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४ रूग्ण, सध्या ३७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading