सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी महापालिकेची करसंकलन केंद्रे सुरू राहणार

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे यासाठी ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. मंगळवार ९ ऑगस्ट, मंगळवार 16 ऑगस्ट आणि शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत कर संकलनाकरिता कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेकरिता, मालमत्ता कराची देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading