स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३६वी जयंती लंडनमध्ये साजरी होणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३६वी जयंती लंडनमध्ये साजरी होणार आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या लंडन ॲकॅडमी ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च आणि महाराष्ट्र मंडळ हॉल यांच्यातर्फे संयुक्तपणे ही जयंती साजरी केली जाणार आहे. ही माहिती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिली. १९०६ ते १९१० मध्ये सावरकर लंडनमध्ये राहत होते. सावरकर हे मोठे क्रांतीकारक कवी, लेखक, इतिहासतज्ञ तसेच भाषा शुध्दीचा अट्टाहास धरणारे होते. सावरकरांच्या कविता या महाराष्ट्रीयनांच्या मुखोद्गत आहेत. वयाच्या ११ व्या सावरकरांनी स्वदेशीचा फटका ही कविता लिहिली. त्यांचं लेखन शाळा, महाविद्यालयीन काळापासून लंडनला जाण्यापर्यंत सुरू होतं. अंदमान मधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांनी अनेक अजरामर कविता रचल्या. ने मजसी ने परत मातृभूमीला ही कविता त्यांनी तिथेच रचली. लंडनमधील कार्यक्रमात सावरकरांच्या कवितांवर भाष्य केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सन्यस्त खड़ग या प्रसिध्द नाटकाचंही सादरीकरण या कार्यक्रमात केलं जाणार असल्याचं डॉ. बेडेकर यांनी सांगितलं. हा संपूर्ण कार्यक्रम डॉ. विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading