स्मार्ट सिटी योजनेतील ४२ प्रकल्पांची खासदार-आमदारांकडून लवकरच पाहणी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत सुरू केलेल्या ४२ प्रकल्पांची खासदार-आमदारांकडून लवकरच पाहणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या आढावा बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ठाणे स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांसंदर्भात लोकप्रतिनिधींची आढावा बैठक झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पान्वये ठाणे महापालिका हद्दीत ४२ प्रकल्प सुरू आहेत. त्यातील पूर्ण झालेल्या आणि प्रलंबित प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींचा दौरा ठेवावा, अशी मागणी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली. त्याला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला. त्यानुसार नियोजित नवे ठाणे स्टेशन, कोपरी सॅटिस, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटसह विविध ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. या दौऱ्यात सर्वपक्षीय खासदार, आमदार सहभागी होणार आहेत. या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेला निधी, या निधीचा वापर आणि रखडलेल्या कामांसंदर्भात चर्चा झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading