जिल्ह्याच्या ४७७ कोटी रूपयांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी

2021-22 या अर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 477 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमीपडु देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. पालकमंत्र्यांच्या अध्येक्षेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आँनलाईन बैठक झाली. कोरोनाविषाणूच्या प्रार्दुभावावर मात करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण,आदिवासी उपयोजना तसेच विशेष घटक योजनेच्या सन 2020-21 च्या प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. जिल्हा विकासासाठी वाढीव निधीची मागणी राज्यस्तरीय बैठकीमध्ये करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे या आर्थिक वर्षात महसुलवाढीचा वेग मंदावला असला तरीही ग्रामीण भागातील सर्वांगिण विकासासाठी रस्ते, पाणी, विज तसेच अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading