स्मार्ट सिटी योजनेच्या सर्वेक्षणात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं महापालिकेचं आवाहन

शहर नियोजनाचे धोरण ठरविताना त्यात नागरिकांचा सहभाग कसा वाढविता येईल, यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचे काम केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजनेतंर्गत करीत आहे. यासाठी देशातील सर्व 100 स्मार्ट सिटी शहरांमध्ये अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022 या कार्यक्रमातंर्गत नागरिक आकलन सर्वेक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सर्व प्रभागसमिती स्तरावरुन जाहिरात, पथनाट्य आदीच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना ठाणे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या. नागरिक आकलन सर्वेक्षण 2022 या उपक्रमात नागरिकांना सहभागी करुन घेता यावे यासाठी आज सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून प्रभागसमितीनिहाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावणे, वेगवेगळ्या विभागात पथनाट्य सादर करणे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घेणे, तसेच हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचावा यासाठी मॉल्स, रेल्वेस्थानक परिसर, एस.टी. स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड आदी ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
केंद्र शासनाच्या ग्रुहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या सुचनांनुसार स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत समाविष्ट देशातील सर्व १०० स्मार्ट सिटी शहरांमध्ये अर्बन आउटकम फ्रेमवर्क २०२२ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांना आपली मते https://eol2022.org/ या बेवसाईटवर नोंदविता येतील यासाठी ठाणे शहरासाठी 802787 हा कोड वापरावा असे आवाहन ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या शहरासाठी या सर्वेक्षणात सहभागी होवून मत नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण देशात ठाणे शहराचे मानांकन वाढण्यात मदत होईल. मत नोंदविण्यास फारसा वेळ लागत नाही. तरी ठाणेकरांनी या सर्वेक्षणात सहभागी व्हावे असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading