स्थायी समिती, परिवहन समिती सभापती पदासाठी १८ नोव्हेंबरला निवडणूक

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला होणार आहे. कोरोनामुळे महापालिका स्थायी समिती सभापती तसंच ५ विशेष समिती सदस्यांची निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र आता या निवडणुकाही १२ नोव्हेंबरला होणार आहेत. परिवहन समिती सदस्यांची निवड झाली असली तरी परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक झाली नव्हती. ती निवडणूक आता जाहीर झाली आहे. महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळं आता या दोन्ही पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक ही ऑनलाईन पध्दतीनं होणार असून ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महिला बालकल्याण, क्रीडा समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य परिक्षण आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती या ५ समितींच्या प्रत्येकी ९ सदस्यांसाठी १२ नोव्हेंबरला ऑनलाईन निवडणूक होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading