ठाणे पोलीस दलातील ३२ अधिका-यांच्या बदल्या

ठाणे पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून ३२ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. गुन्हे अन्वेषण शाखा कल्याणच्या संजीव जॉन यांची खंडणी विरोधी पथकात, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे विकास घोडके यांची गुन्हे अन्वेषण शाखेत, कोपरी पोलीस ठाण्याचे दत्ता गावडे यांची बदलापूर पश्चिम, कळवा पोलीस ठाण्याचे कन्हैय्यालाल थोरात यांची विठ्ठलवाडी येथे, विशेष शाखेच्या सुलभा पाटील यांची शीळ-डायघरला, गुन्हे अन्वेषण शाखेचे अशोक होनमाने यांची भिवंडीला, मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपत पिंगळे यांची कोनगाव पोलीस ठाण्यात, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या ममता डिसोझा यांची कोपरी पोलीस ठाण्यात, शीळ-डायघरच्या चंद्रकांत जाधव यांची विशेष शाखेत, खंडणी विरोधी पथकाचे राजकुमार कोथमिरे यांची मानव संसाधन विभागात, नियंत्रण कक्षातील विलास पाटील यांची भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण विभागात, आर्थिक गुन्हे शाखेच्या वनिता पाटील यांची चितळसर पोलीस ठाण्यात, खंडणी विरोधी पथकातील संजय शिंदे यांची अंमली पदार्थ विरोधी पथकात, मुंब्र्याचे रामचंद्र वळदकर यांची राबोडीमध्ये, चितळसर पोलीस ठाण्याच्या प्रियतमा मुठे यांची वागळेला, राबोडीच्या सुधाकर हुंबे यांची खंडणी विरोधी पथकात, नौपाड्याचे अविनाश सोंडकर यांची कोपरीला, राबोडीच्या दिलीप रावस यांची कळव्याला, कासारवडवलीचे प्रदीप उगले यांची नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील शहाजी शिरोळे यांची ठाणे वाहतूक शाखेत बदली झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading