स्टारलेट सौंदर्य स्पर्धेत उर्वशी केशवानी ही स्टारलेट २०२० सौंदर्यवती तर अभिषेक गाडेकर ठरला मिस्टर परफेक्शनिस्ट

डीजी मिडीया आणि अभिनय कला केंद्रातर्फे आयोजित सौंदर्य स्पर्धेत उर्वशी केशवानी ही स्टारलेट २०२० सौंदर्यवती तर अभिषेक गाडेकर ठरला मिस्टर परफेक्शनिस्ट. कलाकारांना एक सुवर्णसंधी म्हणून अभिनय कला केंद्राच्या रोहित गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपले कौशल्य ट्रॅडीशनल, वेस्टर्न अशा अनेक राऊंडमधून रॅम्पवॉकच्या माध्यमातून दाखवता आले. स्टारलेट २०२० म्हणून अभिषेक गाडेकर, मिसेस म्हणून टिना भटनागर तर मिस म्हणून उर्वशी केशवानी हिची निवड झाली. रोहित भोजनेनं द्वितीय क्रमांक तर पवन सोनगिरेनं तृतीय क्रमांक पटकावला. मिसेस स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सोनल सावंतला तर तृतीय क्रमांक इंदू हरजाईला मिळाला. मिस स्पर्धेत सायली कदमला दुसरा तर समृध्दी पाटीलला तिसरा क्रमांक मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading