महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केला. मानव मोरे, वेदांत गोखले, सोहम साळुंखे या तीन जलतरण पटूंनी गोव्यातील डोना पोला बीच ते मांडवी नदी पूल हे १० किलोमीटर अंतर पोहून पार केलं. वेदांत गोखलेनं हे १० किलोमीटरचं अंतर ३ तास ९ मिनिटं ४५ सेकंद, मानव मोरेनं ३ तास २१ मिनिटं तर सोहम साळुंखेनं ३ तास २५ मिनिटं ३९ सेकंदात हे अंतर पार केलं.