पातलीपाडा येथे एका इमारतीच्या तिस-या मजल्यावर आग – जिवितहानी नाही

ठाण्यातील पातलीपाडा येथे एका इमारतीच्या तिस-या मजल्यावर भल्या पहाटे आग लागली होती. मात्र यात सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नाही. पातलीपाडा येथील ऋतू इस्टेटच्या तिस-या मजल्यावर असलेल्या सदनिकेला ही आग लागली होती. ही आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दल, महावितरणच्या अधिका-यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलानं या इमारतीत राहणा-या २२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं. त्यामुळं कोणतीही जिवितहानी झाली नाही. ही आग नक्की कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading