​कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा

दत्तजयंतीचा उत्सव आज मोठ्या भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाचे निर्बंध काहीसे कमी झाल्यामुळे दत्तजयंतीला भक्तांना मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घेता आलं. विविध ठिकाणी दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. पण हा दत्तजयंती उत्सव साजरा करताना गर्दी होऊ नये याचीही काळजी आयोजकांनी घेतल्याचं दिसत होतं. दत्तजयंतीनिमित्त दत्तमंदिरांवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. दत्तमंदिरांप्रमाणेच साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ मठांमध्येही पारंपरिक पध्दतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला. दत्तजयंतीचा उत्सव काहीजण घरातही साजरा करतात. ठाण्यातील विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर, चव्हाण दत्त मंदिर, चेंदणी कोळीवाड्यातील दत्तमंदिर आणि कौपिनेश्वर येथील दत्तमंदिरात भाविकांनी श्री गुरूदत्तांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading