सोलापुरात मधमाशांचे पोळे घरातून वनविहिरीत हलवण्याचा अनोखा प्रयोग

सोलापुरात मधमाशांचे पोळे घरातून वनविहिरीत, हलवण्याचा अनोखा प्रयोग वन्यजिवप्रेमींनी यशस्वी केला आहे. पाच तासांच्या परिश्रमाला कोणत्याही अडचणी शिवाय यश आलं आहे. मधमाशी दूरुन जरी दिसली, तरी सामान्य माणूस ती दंश करेल या भीतीने दूर जातो. तिथं अख्ख मधमाश्यांच पोळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं धाडस सोलापुरातील वन्यजीवप्रेमींनी केले आहे. मधमाश्यांचा पोळ पाच किलोमीटर दूर असलेल्या सिद्धेश्वर विहिरीतील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. सोलापुरातील फरहान इनामदार यांच्या घरात मधमाश्यांचा मोहोळ लागलं होत. इनामदार कुटुंबियांनी याची माहीती वन्यजीवप्रेमींना दिली. वन्यजीव प्रेमींनी ‘हनी बी किट’ परिधान केलं आणि एका बॉक्समध्ये लाईटचा प्रकाश दाखवून पूर्ण मधमाश्यांचा पोळ बॉक्समध्ये घेऊन ते सिद्धेश्वर वनविहिरीत सुरक्षितरित्या सोडलं. सुदैवान यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading