जुनी निवृत्ती योजना लागू करावी या मागणी साठी शासकीय कर्तचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. आज सातव्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांनी दुपारच्या सुमारास थाळीनाद आंदोलनं केलं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या संपा बाबत जनमानसात आता तीव्र भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. या संपामुळे शासकीय कामकाज जवळपास ठप्प झालं असुन त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसू लागला आहे. एकीकडे शासन संपा बाबत कठोर भूमिका घेत असताना दूसरीकडे शासकिय कर्मचाऱ्यांच्या या संपाला शासकिय कर्मचाऱ्याच्या इतर संघटनांकडूनही पाठींबा वाढत आहे. त्यामुळे ऐन सणासुदिच्या दिवसात हा संर्घष वाढण्याची शक्यता दिसत आहे.