सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराचा मालकाच्या 12 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराने मालकाच्या 12 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना डोंबिवली मध्ये घडली आहे. ५० हजाराचे कर्ज फेडण्यासाठी दुकान मालकाचे १२ लाखांहुन अधिक किंमतीचे दागिने घेऊन नोकर पळून गेला. मात्र डोंबिवली रामनगर पोलिसांनी या नोकराला तीन तासातच त्याला ठाकुर्ली रेल्वे स्थानकामध्ये बेड्या ठोकल्या आहेत. विक्रम रावल असे अटक केलेल्या नोकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार बसंतीलाल चपलोत यांचे डोंबिवली पूर्व भागात नेहरु रस्त्यावर प्रगती ज्वेलर्स शॉप आहे. या दुकानात आरोपी विक्रम हा काही वर्षापासून काम करतो. विक्रम विश्वासू असल्याने दुकानमालक बसंतीलाल यांनी विक्रमकडे दुकानातील १२ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले होते. विक्रम ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दुकानातून सोन्याचे दागिने घेऊन बाहेर पडला. मात्र तो दागिने घेऊन परतलाच नाही. त्यानंतर त्यांनी होलमार्क करणाऱ्या ठिकाणी संपर्क साधला. तेथेही तो गेला नसल्याचे आढळून आले. मालक बसंतीलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात विक्रम विरुध्द तक्रार केली. तक्रारदार यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाचवेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे नोकर विक्रमचे मोबाईल लोकेशन ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांना पाहताच नोकर विक्रमने लोकलमधून पळ काढत होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळी असा १२ लाख ७२ हजाराचे दागिने जप्त केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading