सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या दोन बहिणींना अटक

सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या दोन बहिणींना अटक – कल्याण मधील सोनाराच्या दुकानातून हातचालाखीने दागिने लंपास करणाऱ्या उल्हासनगर मधील दोन सख्या बहिणींना सीसीटीव्ही फुटेज आधारे महात्मा फुले चौक पोलिसांना अटक करण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार विमल शंखलेशा, यांच्या मालकीचे एम. एम. शंखलेशा ज्वेलर्स, नावाने कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी परिसरात सोने चांदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात सायंकाळच्या सुमारास दोन महिला अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. त्यावेळी दुकानातील कामगाराने त्यांना अंगठ्याचे बॉक्स मधील अंगठी दाखविले असता, दुकानात इतरही ग्राहकांना दागिने दाखविण्यात कामगार व्यस्त असल्याचे पाहून त्या दोन्ही महिलांनी हातचालाखीने आंगठी लंपास करून दुकानातून निघून गेल्या. त्यानंतर अंगठ्याचे बॉक्स कपाटात ठेवत असताना त्यामधील एक आंगठी चोरीस गेल्याचे कामगाराच्या लक्षात येताच, दुकान मालक शंखलेशा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या दोन अनोखळी महिलांवर संशय व्यक्त करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल असलेल्या अज्ञात महिला आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपासासाठी दिला होता. तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर उल्हासनगर शहरातील पाच नंबर भागातील कुर्ला कॅम्प येथून निशा आणि रेश्मा या दोघींना सापळा रचून ताब्यात घेतले.अटक महिला आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. शिवाय उल्हासनगर मधील एका सोनाराच्या दुकानात दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. महिला आरोपींकडून ९ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ५६ हजार रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading