विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही – प्राचार्य सुचित्रा नाईक

विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशी ग्वाही प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी दिली. ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येत असतात. मात्र, ही शिक्षा आशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नकोच असे म्हणत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याच जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे. एनसीसी चे हेड जे असे असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात. ते कोणी शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार आहे. याने एनसीसी च्या मार्फत जी चांगली काम होतात ती लपली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊ नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, आम्हाला येऊन भेटावे, एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असेही नाईक यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading