प्रादेशिक मनोरुग्णालयात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन आणि भत्ता दिला जात नाही

प्रादेशिक मनोरुग्णालयात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन आणि सुरक्षिततेची साधने दिली जात नसल्याची तक्रार भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली. त्यावेळी या प्रकाराची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी आश्वासन दिले. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेकडून गेल्या ४ वर्षांपासून कायदेशीर वेतन आणि भत्ता दिला जात नाही. कामगार कायद्यानुसार मास्क, हॅण्डग्लोव्हज, गणवेश आदी दिले जात नाही. त्यामुळे या कामगारांवर अन्याय होत आहे. या कामगारांना दरमहा सात तारखेला किमान वेतन द्यावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. त्याचबरोबर मनोरुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी दिली. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. तसेच इमारतीची आवश्यक दुरुस्ती केली जाईल, असेही सावंत यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading