लोक सहभागातुन तालुकासरीय १३८ कुपोषीत बालकांच आरोग्य तपासणी शिबीर

लोक सहभागातुन तालुकासरीय १३८ कुपोषीत बालकांच आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आलं होत. एकीकडे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे अशी माहिती समोर येत असताना तालुकास्तरीय १३८ कुपोषित बालकांची तपासणी शिबिर भिवंडी तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात घेण्यात आले. तालुका पातळीवर उत्तमरित्या बालकांची काळजी घ्यावी या उद्देशाने बालकांची तपासणी करण्यात आली तसेच बालकांनी संतुलित आहार कोणते द्यावे या संदर्भात जनजागृतीसाठी संतुलित आहार संदर्भात स्टॉल लावण्यात आले होते. पालकांना आणि बालकांना आरोग्य तपासणी शिबिरामार्फत वैद्यकीयदृष्ट्या माहिती मिळावी आणि तपासणी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी १०८ या रुग्णवाहिकेच्या मदतीने आरोग्य शिबिरास पोहोचवण्यात आले. कुपोषणाच्या निर्मूलनासाठी आम्ही वाटचाल सुरू केली आहे. मुलांचे आरोग्य हेच आपले भविष्य आहे असे मार्गदर्शन तालुका आरोग्य अधिकारी यांनी पालकांसोबत संवाद साधताना केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading