सेट टॉप बॉक्स दुरूस्तीच्या बहाण्यानं घरी आलेल्या भामट्यानं महिलेच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास

सेट टॉप बॉक्स दुरूस्तीच्या बहाण्यानं घरी आलेल्या एका भामट्यानं ज्येष्ठ नागरिक महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लंपास करण्याची घटना घडली आहे. नौपाड्यातील बी-केबिन परिसरात हा प्रकार घडला आहे. नौपाड्यातील शिवाजीनगर भागातील रेल्वे क्वॉर्टर्स समोरील अनुभव सोसायटीत सुरेश कदम हे आपल्या पत्नीसोबत राहतात. २४ डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या घरी आलेल्या २० ते २५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीनं सेट टॉप बॉक्स खराब झाल्यानं दुरूस्तीसाठी आल्याची बतावणी केली. आपल्या मुलानं मॅकेनिकला पाठवलं असेल अशा विचारानं सुरेश कदम यांनी सेट टॉप बॉक्स दुरूस्तीसाठी अनुमती दर्शवली. त्यावेळी सेट टॉप बॉक्सला आधार देण्यासाठी कदम यांच्या पत्नीच्या हातातील ५० हजार रूपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेतल्या आणि हातचलाखीनं दोन्ही बांगड्या घेऊन पसार झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading