सेंट जॉन लर्निंग ॲपचं उद्घाटन

तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेणार नाही परंतु शिक्षकाच्या हातात असलेले तंत्रज्ञान परिवर्तन घडू शकते या उद्देशाने सेंट जॉन लर्निंग ॲप उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात सेंट जॉन द बाप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फीत कापून सेंट जॉन लर्निंग ॲप चे उद्घाटन करण्यात आले. आज विकासासाठी बदलाची अत्यंत गरज आहे त्याच वेळी स्मार्टफोन टॅबलेट आणि इंटरनेट यासारख्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने अवलंब केल्याने विकासाला आणखीन चालना मिळेल सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक उपलब्ध आणि सुलभ होईल मुलांना विविध शैक्षणिक स्तरावर प्रगती करण्याच्या उद्देशाने सेंट जॉन लर्निंग ॲपची निर्मिती करण्यात आली असल्याचं मुख्याध्यापक फादर थॉमसन कीणी यांनी सांगितलं. या ऍपच्या माध्यमातून रोज शाळेमध्ये मुलांना काय शिकवण्यात आले याची माहिती मिळणार आहे. मुलांना रिव्हीजनसाठी याचा उपयोग होणार असून मुलांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे किणी यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading