सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरणा केंद्रे सुरू राहणार

महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता कर देयके अदा करणे सोयीस्कर व्हावे यासाठी 15 सप्टेंबरपर्यत प्रभागसमिती स्तरावरील मालमत्ता संकलन केंद्रे आणि कार्यालये सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी- रविवारी देखील सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांना सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पध्दतीने भरता यावीत यासाठी महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना आपली देयके भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी शनिवारी- रविवारी देखील महापालिका प्रभागस्तरावरील मालमत्ता कर संकलन केंद्रे व त्या संलग्न असलेली सर्व कार्यालये 15 सप्टेंबरपर्यत सुरू राहणार आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर अशी संपूर्ण रक्कम भरतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये सूट देण्यात येणार आहे. सन 2020-21 या संपूर्ण मालमत्ता कर 15 सप्टेंबरपर्यत भरल्यास 10 टक्के सूट, 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भरल्यास 4 टक्के, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरल्यास 3 टक्के तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. शनिवार 22 ऑगस्टला गणेशोत्सव असल्याने या दिवशी सर्व कार्यालये बंद राहतील.
नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या ऑनलाईन पध्दतीचा आणि प्रत्यक्ष कार्यालयात जावून कर भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading