कशिश पार्क, परबवाडी, रघुनाथनगर परिसरातील रहिवाशांची विनामूल्य कोविड टेस्ट

शिवसेना आणि सर्बबन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली. यावेळी कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पणही करण्यात आले. ही अॅम्ब्युलन्स २४ तास परिसरातील रुग्णांसाठी सज्ज राहणार असून त्याचा कशिश पार्क, परबवाडी, मेंटल हॉस्पिटल, रघुनाथनगर भागातील रहिवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. मिशन झिरोकडे वाटचाल करत असताना रुग्णांचा संसर्ग आणि संपर्क कमी करण्याच्या हेतूने त्याचप्रमाणे कोव्हिड रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्यामुळे मृत्यूदरही कमी करण्याकरिता ही टेस्ट उपयुक्त ठरते. यावेळी परिसरातील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांची विनामूल्य टेस्ट करण्यात आली. त्यातून कोरोनावर मात करणे अधिक सोपे होईल, असे आयोजक विकास रेपाळे यांनी सांगितले. या भागातील नागरिकांच्या सेवेसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पणही करण्यात आले. कार्डियाक अॅम्ब्युलन्स परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading