सी आय एस सी ई बोर्डाचा निकालात सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल मधील यश भासेन याने ९९.८ टक्के आणि इप्शिता भट्टाचार्य हिने ९९.७५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना खासदार राजन विचारे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना यश मिळण्यात ज्यांचे मोलाचे योगदान लाभले त्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या प्राध्यापक रेवती श्रीनिवासन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.