मोटार अपघातात निधन झालेल्या पोलीस अंमलदारास एचडीएफसी बँकेकडून मिळाले विम्याचे १ करोड रूपये

मोटार अपघातात निधन झालेल्या पोलीस अंमलदारास एचडीएफसी बँकेकडून विम्याचे १ करोड रूपये मिळाले आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई घनश्याम गायकवाड हे कर्तव्यावर असताना नोव्हेंबर २०२२ मध्ये पहाटेच्या सुमारास नितीन कंपनीजवळ अपघात झाला होता. आणि त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. ठाणे पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची पगार खाती एचडीएफसी बँकेत ठेवण्याबाबत करार केला आहे. या कराराअंतर्गत पोलीस दलातील कोणत्याही कर्मचा-याचे अपघातात निधन झाल्यास १ करोड रूपये विमा बँक देणार आहे. त्यानुसार घनश्याम गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांची आई मंगल गायकवाड ह्यांच्याकडे १ करोड रूपयांचा धनादेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading